TOD Marathi

टिओडी मराठी, टोकियो, दि. 25 जुलै 2021 – आज टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. भारताने दुसर्‍या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्यपदकासह आपल्या पदकाचे खातं उघडले आहे.

आजही भारत अनेक खेळात घेणार आहे. आज दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. स्टारखेळाडू मनू भाकर आणि यशस्विनी देसवाल 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. त्यांना हार पत्करावी लागली.

रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम, पीव्ही सिंधू व जी साथियानसारखे स्टारखेळाडू मैदानामध्ये एन्ट्री करणार आहेत.

भारतीय खेळाडू बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस आणि स्विमिंग यामधील आपले कौशल्य दाखवतील. प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान उभं करतील.

याशिवाय, सेलिंग, नौकाविहार, कलात्मक जिम्नॅस्टिक आणि स्विमिंगमध्येही भारत आपला दम दाखवणार आहे.