TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यात. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करणार आहेत. हा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होणार आहे, अशी शक्यता आहे. तसेच सीबीएसईने अकरावीला गणित विषयाची निवड करण्याविषयीच्या नियमामधून सूट दिली असून ही सूट केवळ यावर्षीसाठीच लागू असणार आहे, असेही सांगितले आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशातील काही परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तर कही परीक्षा थेट रद्द केल्या आहेत.

सीबीएसईने दहावीला बेसिक मॅथ्स विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला मॅथ्स शिकण्याची संधी मिळणार आहे, असं म्हटलं आहे. सीबीएसईच्या निर्णयामुळे दहावीला स्टँडर्ड मॅथ्स’ची निवड केली नसली तरीहि अकरावीला मॅथ्स’ची निवड करता येणार आहे. अंतर्गत मूल्यमापन होणार असल्याने उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकन, फोटोकॉपी विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत.

कोरोनामुळं नियमात दिली सूट :
सीबीएसईने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी व्हावा म्हणून बेसिक गणित व स्टँडर्ड गणित असे पर्याय ठेवले होते. स्टँडर्ड गणित असणाऱ्यांना अकरावी व बारावीला गणित विषयाची निवड करता येत होती. बेसिक गणित विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे मॅथ्स शिकायचा असल्यास परीक्षा देण्याचा नियम आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सूट दिली जाणार आहे.

जाणून घ्या , काय होता 2019 चा नियम :
सीबीएसईने 2019 मध्ये एक नियम लागू केला होता. त्यानियमाप्रमाणे दहावीला ज्या विद्यार्थ्यांनी स्टँडर्ड गणित विषयाची निवड केली असेल. त्या विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीला मॅथ्स विषय निवडता येत होता. ज्यांना स्टँडर्ड गणित नको, ते बेसिक गणित विषयाची निवड करत होते. दहावीनंतर एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्स विषय निवडायचा असल्यास त्यांना 10 वीची कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागत होती.