TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 27 जून 2021 – मागील वर्षांपासून कोरोनाने जगात थैमान घातले आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, या कोरोना काळात अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील ब्रिस्टोल इथल्या एका 72 वर्षीय आजोबांना कोरोनाची लागण झाली. एक नव्हे तर, त्यांच्या 43 वेळा कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या.

डेव्ह स्मिथ असे या वयोवृद्धाचे नाव आहे. त्यांचा कोरोना अहवाल एक-दोन नव्हे तर सुमारे 10 महिन्यांपासून पॉझिटिव्ह येत आहे.

अमेरिकेतील रिजेनेरॉन या बायोटेक कंपनीने तयार केलेले सिंथेटिक अँटीबॉडीजचे कॉकटेल दिल्यानंतर ते आता कोरोनामुक्त झालेत. या उपचार पद्धतीला ब्रिटनमध्ये अद्याप मान्यता नसली तरी स्मिथ यांची प्रकरणात त्याला परवानगी दिली.

वेस्ट इंग्लंडमधील ब्रिस्टल इथल्या सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव्ह स्मिथ यांनी सांगितलं की, माझी 43 वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात मला ७ वेळा रुग्णालयात दाखल केलं.

मी माझी अंत्यसंस्काराची योजना आखली गेली होती. शेवटी हार मानून मी कुटूंबाला बोलावून सर्वांना निरोप दिला होता.