टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 23 जुलै 2021 – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या या शेतकऱ्यांच्या विरोधात नवनियुक्त मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले होते.
आंदोलन करणारे शेतकरी नसून ते मवाली आहेत, असे करून ते केवळ दलालांची मदत करत असल्याची टिप्पणी नवनियुक्त मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. २६ जानेवारीला झालेला हिंसाचार लज्जास्पद आहे. विरोधी पक्ष या आंदोलनाला फूस देत आहे, अशी टीका लेखी यांनी केली होती.
त्यांच्या या शेतकऱ्यांप्रती केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांनी माफी मागितलीय. मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकरी मवाली आहे, असे विधान केल्याने वाद निर्माण झाला होता.
मीनाक्षी लेखी यांनी माफी मागताना शेतकरी संसद दरम्यान पत्रकरांशी बोलताना म्हणाल्या, मी केल्या विधानाचा विपर्यास केला. दिल्लीतील जंतरमंतरमध्ये कृषी कायद्यांविरोधामध्ये आयोजित आंदोलनादरम्यान एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर हल्ला केला होता.
यावर जेव्हा मला माझं मत विचारल्या गेलं त्यावेळी मी आंदोलन करणारे शेतकरी नाहीत, मवाली आहे, असे म्हंटले नसून उत्तर देतांना मी शेतकरी नाही. तर केवळ मवाली अशा गोष्टी करु शकतात, असे म्हटलं होतं.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या, मी केल्या विधानाचा विपर्यास करण्यात आणि त्यामुळे शेतकरी किंवा अन्य कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागते. माझे शब्द मागे घेते, असे लेखी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.