TOD Marathi

टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 23 जुलै 2021 – लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारे वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणीत वाढ झालीय. निवृत्ती महाराजांना संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायलयानं दिलासा मिळाला होता. मात्र, आता त्यांच्या विरोधात राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे.

पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अडचणीमध्ये आलेल्या निवृत्ती महाराज यांच्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये खटला दाखल केलाय. या खटल्यामध्ये संगनमेर न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या बाजूने निकाल दिला होता.

महाराष्ट्र अंनिस पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये संगमनेर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्याने इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो तर, विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते. तसेच स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर आपत्य रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी वारंवार आपल्या कीर्तनातून करत पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केलं होते.

याअगोदर संगमनेर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी 30 एप्रिल रोजी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आता राज्य सरकारनेही अपील दाखल केलं आहे. त्यामुळे इंदुरोरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झालीय.