TOD Marathi

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे (The High Court has given relief to Rituja Latke) आणि त्यांच्या उमेदवारीचा मार्ग यामुळे मोकळा झालाय. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत तिकीट जाहीर केलं होतं. मात्र, ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र मुंबई महानगरपालिकेने तो राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यानंतर ऋतुजा लटके यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आवश्यक कारवाई सुरू आहे. प्रक्रिया करण्यास 30 दिवस लागतील असे उत्तर पालिकेच्या वतीने देण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेने ऋतुजा लटके यांना दिलासा देत त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे.

त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मैदानाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना न्यायालयातून एक विजय मिळाला होता. पुन्हा एकदा ठाकरे गटाने न्यायालयातून विजय मिळवलेला आहे.