TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी तीन दिवस हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरामध्ये पाणी शिरलं आहे. घरे व बाजारपेठा पाण्याखाली गेल्यात. त्यामध्ये आता चिपळूणमध्ये 8 करोनाग्रस्तांना ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे, असे समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलं आहे. गुरुवारी पहाटेपासून चिपळूणमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. यामुळे चिपळूणमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपरांत कोविड हॉस्पिटल ही पुरात अडकले. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या कोविड रुग्णालयामध्ये 21 रुग्णांवर उपचार सुरू होती.

यात काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमधील 8 करोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

या दरम्यान पूरस्थितीमुळे चिपळूणमध्ये वीज पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे चार्जिंग अभावी अनेकांचे फोन बंद आहेत. यामुळे अपरांत हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता. यानंतर रुग्णालयामध्ये नक्की काय झालं? हे कळलं नाही. मात्र, 8 करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, असं सांगण्यात येत आहे.