TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 22 जुलै 2021 – देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मागील दीड वर्षापासून होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वच उत्सव रद्द करावे लागलेत, त्यामुळे सगळ्यांची निराशा झाली होती. मर्यादित स्वरुपामध्ये गणेशोत्सव ही केवळ घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी दिली होती.

यंदा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यानंतर आता मनसेने दहीहंडी जल्लोषामध्ये साजरी करण्याचा निर्धार केलाय. मनसेकडून यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार आहे, असे जाहीर केले आहे.

सध्या कोरोनामुळे मागील वर्षी अनेक सण-उत्सवांवर बंधन आले होते. त्यामुळे अनेकांमध्ये निराशा झाली आहे.

मागील वर्षी गणेशोत्सव साजरा करता आला नाही. गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे.