TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेस्को मैदानावर थोड्याच वेळात (MNS President Raj Thackeray At Nesco Ground) मुंबईतील गट अध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निशाणावर कोण असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि भाजप नेतृत्वावरही निशाणा साधला (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party Chief Uddhav Thackeray Led Farmers Meeting At Chikhali In Buldhana District Of Vidarbha. This Time He Also Targeted The State Government And The BJP Leadership).

गेल्या काही काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Governor Bhagat Singh Koshyari, BJP Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनी केलेली विधानं त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर सांगलेला दावा या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केली होती. त्याच मुद्द्यांवर राज ठाकरे देखील भाष्य करण्याची शक्यता आहे. येत्या काळात महाराष्ट्रात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेच्याही निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या एकूण मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.