टिओडी मराठी, पुणे, दि. 29 मे 2021 – महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरू असून अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हि कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखाने पूढे सरसावले आहेत. आता साखर कारखाने ऑक्सिजन निर्मिती करणार आहेत. राज्यातील 25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीची तयारी दर्शवली आहे.
त्यामध्ये 19 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी तैवान येथून यंत्रसामग्री मागविलीय. लवकर या कारखान्यांमधून ऑक्सिजन निर्मिती करणार आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे, असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सांगितले होते.
त्यानुसार राज्यातील 25 कारखान्यांनी तयारी दर्शविली असून धाराशिव साखर कारखान्यांने प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू केलीय. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची महिती दिलीय.
ऑक्सिजन निर्मितीबरोबर यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिलाय. केंद्र सरकारने 108 कोटी लिटरचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केलं आहे. साखर कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केल्यामुळे साखरेचा गाळप उतारा 10.50 टक्के झाला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.
More Stories
“मतं मागायची असतील तर स्वतःच्या बापाचे नाव वापरा”, – उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर शिंदे गटाची पत्रकार परिषद, वाचा प्रमुख मुद्दे
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपली, ‘हे’ महत्त्वाचे ठराव घेण्यात आले