TOD Marathi

टिओडी मराठी, पणजी, दि. 29 मे 2021 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्फ्यू येत्या 7 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. जिल्हाधिकारी याविषयीचा तपशीलवार आदेश जारी करतील, असे गोवा सरकारने शनिवारी दुपारी येथे जाहीर केले आहे.

राज्यात कर्फ्यू वाढविला जाईल, असे वृत्त एका दैनिकाने दिले होते. आता ते खरे ठरले आहे. कोरोना रुग्ण संख्या सध्या घटू लागलीय. ती आणखी कमी व्हावी, या हेतूने सरकारने कर्फ्यू सध्या सात दिवसांसाठी वाढवलाय. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही.

राज्यात कर्फ्यूची मुदत उद्या ३० रोजी संपत होती पण, तत्पूर्वी सरकारने निर्णय घेतलाय. कर्फ्यूच्या उर्वरित अटी ह्या पूर्वीप्रमाणेच राहतील, अशी माहिती मिळाली आहे. सध्या गोवा राज्यात केसिनो, मद्यालये, रेस्टॉरंट, मासळी बाजार हे सगळे बंद राहणार आहेत.