TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जून 2021 – केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकर फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार आहे, असे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलंय. तसेच नरेंद मोदी यांनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे. तसेच त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला.

मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झाल्यास दुसऱ्या काळातील नरेंद्र मोदी सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. या फेरबदलासाठी एकूण 23 खाते निवडण्यात आले आहेत. या खात्याच्या मंत्र्यांच्या कामाची स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकशी केलीय.

पंतप्रधानांनी आतापर्यंत धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, गजेंद्र सिंह शेखावत, महेंद्र नाथ पांडेय, हरदीप पुरी आदी मंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतलाय. तसेच इतरही काही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे, असे समजते.

  • काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक आहे पदाचा भार :
    रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे वाणिज्य, रेल्वे मंत्रालयाव्यतिरिक्त उपभोक्ता मंत्रालयाचा आहे कारभार.
    माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह अवजड उद्योग मंत्रालयाचा आहे कारभार.
    कृषी, पंचायती राज, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे अन्न प्रक्रियेचा अतिरिक्त आहे कार्यभार.
    आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे आहे.

आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 59 मंत्री :
मागील एक वर्षापासून कोरोनामुळे कॅबिनेटच्या विस्ताराची परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. मात्र, मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या 21 कॅबिनेट आणि 9 स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि 29 राज्यमंत्री आहेत.

फेरबदलात यांच्या नावाची होतेय चर्चा:
मंत्रिमंडळाच्या फेरबदलात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दलला प्रतिनिधीत्व देणार आहे, असे समजत आहे.