टिओडी मराठी, काबूल, दि. 18 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान संघटना आता आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आपला खरा रंगही दाखवत आहेत. यावेळी देशाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढणाऱ्या महिला सलीमा मजारी यांना तालिबाने अटक केली आहे.
सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गवर्नर आहेत. अलीकडे तालिबानने देशात हिंसाचाराला सुरुवात केल्यानंतर सलीमा यांनी या विरोधात आपली स्वतःची फौज निर्माण केली होती. त्यांनी शेवटपर्यंत तालिबानशी लढा दिला.
सध्या तालिबानचा वाढता प्रभाव लक्षात घेता अफगाणिस्तानचे अनेक नेते देश सोडून पळून जात होते. पण, सलीमा मजारी या तालिबान विरोधात आपल्या काही सैनिकांसोबत एकट्या लढत होत्या. अफगाणिस्तानचा बल्ख प्रांतावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यातील सलीमा मजारी यांना तालिबानने अटक केली.
अफगाणिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीन महिला गवर्नर म्हणून नियुक्त झाल्यात. सलीमा मजारी या अफगाणिस्तान देशाच्या पहिल्या महिला गवर्नर होत्या.
सलीमा या बल्ख प्रांतातील चाहर जिल्ह्यामधील रहिवासी असून येथील एकूण लोकसंख्या सुमार 32 हजारांहून अधिक आहे. पण, त्यांनी शेवटपर्यंत तालिबानला आपल्या भागावर ताबा मिळवू दिलेला नाही. या भागासाठी तालिबान्यांना बराच संघर्ष करावा लागला.
जन्म इराणचा अन लढा अफगाणिस्तानसाठी –
सलीमा मजारी यांचा जन्म इराणमधील आहे. पण, सोव्हिएत युद्धादरम्यान त्या अफगाणिस्तानात आल्या. त्यानंतर त्यांनी तेहरान विद्यापीठामध्य शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या अफगाणिस्तानच्या राजकारणाकडे वळाल्या.
तालिबानने पुन्हा डोकं वर काढल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मभूमीसाठी तालिबानचा रोष ओढावून घेतला. आपली सैन्यांची तुकडी उभी करून शेवटच्या क्षणापर्यंत तालिबानशी लढत राहिल्या. अखेर त्यांना तालिबानने अटक केली.