TOD Marathi

कानपूर: “मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं”, अशी खंत ओवेसी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं, असं ओवेसी यांनी यावेळी म्हटलं. प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे मात्र मुस्लिमांकडे असा कुठला त्यांचा नेता नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

आता पुढील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी आपले उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसी यांनी केली आहे. राज्यातील ८२ असे मतदारसंघ आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून उमेदवारांचं भवितव्य ठरवू शकतात.