TOD Marathi

भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेलमध्ये सुरू आहे. (BJP State executive in Panvel) या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (DCM Devendra Fadnavis) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कामाला लागा, “मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Cirporation) भाजपचा भगवा फडकवायचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्यासाठी सर्व ताकदीनिशी कामाला लागा” असं महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणुका लढल्या होत्या मात्र त्यानंतर शिवसेनेचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि पुढे भाजप शिवसेना युतीचे सरकार निर्माण होऊ शकलं नाही. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करत सरकार तयार केलं त्यामुळे सर्वात जास्त संख्या विधानसभेत असूनही भाजपला सत्तेबाहेर रहावं लागलं. त्यानंतर शिवसेना-भाजप मधील दरी वाढत गेली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना थेट शिवसेनेला आव्हान दिलं असल्याची चर्चा आहे. आता होणारी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी देखील अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेनेतील आमदारांचा आणि खासदारांचाही एक मोठा गट एकनाथ शिंदेंसह वेगळी चूल मांडू पाहत असताना शिवसेनेसाठी ही निवडणूक लढवणं देखील एक मोठं आव्हान असणार आहे. सोबतच भाजपशी कडवी झुंज देणे अशा दुहेरी गोष्टींना शिवसेनेला तोंड द्यावं लागणार आहे.