TOD Marathi

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना का सोडली यांचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेना सोडल्याचे कारण सांगितले आहे. आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना कधीही बोलली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका घेऊन मी मोर्चात सहभागी झालो होतो. तेव्हा माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरू झाली राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. बाळासाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेणार होते. त्याचवेळी मंडल आयोग लागू झाला पाहिजे, म्हणून अनेक आमदार माझ्यासोबत होते आणि हेच कारण झालं मी शिवसेना सोडली, असे भुजबळ यांनी सांगितले.

बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. आरक्षण मिळालं पाहिजे, असं मी नेहमी म्हणायचो. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते. त्यामुळे शिवसेना आणि माझ्यात दुरावा झाला अन् मी शिवसेना सोडली. त्यानंतर मी समता परिषदेची स्थापना केली, असं भुजबळ म्हणाले आहे.