TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 28 जून 2021 – माहिती तंत्रज्ञान विषयक संदर्भात फेसबुक इंडिया आणि गुगल इंडिया यांना संसदेच्या स्थायी समितीने 29 जुलै रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यांच्यात आयटीच्या विविध विषयाबाबत चर्चा होणार आहे.

नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे व सोशल मिडीयाच्या गैरवापराराला रोखण्याबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात या कंपन्यांना विचारणा करण्यात येणार आहे. यादरस्यान डिजीटल माध्यमांवर महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाणार आहे.

भारताच्या नव्या माहिती तंत्रज्ञान विषयक कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी ट्विटरचे काही अधिकारी संसदीय समितीसमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर 10 दिवसांनी हे समन्स बजाविले आहेत.

सोशल मिडीयाचे गैरवापर रोखणे व ऑनलाईन वृत्तांवर नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा करण्यासाठी 18 जुलै रोजी संसदीय समितीने ट्‌विटरला पाचारण केले होते.

भारतातील माहिती तंत्रज्ञानविषक नवे कायदे हे सर्वसामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बनविले आहेत. या ग्राहकांना आपल्या अधिकारांबाबत अधिक सक्षम करण्यासाठी केलेत.

यासंदर्भात 2018 मध्ये सर्व संबंधितांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हे नियम केले आहेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम प्रतिनिधींनी 20 जून रोजी स्पष्ट केलं आहे.