टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 जून 2021 – राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन सातत्यानं मोदी सरकारवर टिका करत आहेत. राहुल यांनी यावेळी नेटिझन्सला प्रश्न विचारुन त्याचं उत्तर स्वत:च दिलं आहे. केंद्र सरकारमधील कुशल मंत्रालय कोणतं?”, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे”, असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
कोरोनाच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांनी याअगोदर केंद्र सरकारवर देशातील कोरोना मृत्यूंचे आकडे लपविल्याचा आरोप केला आहे. याशिवाय देशातील प्रत्येक नागरिकानं आता मोफत लस मिळविण्याच्या मागणीसाठी पुढे यायला हवं, असं म्हटलं होतं.
देशातील प्रत्येक नागरिकाला लस देणं केंद्र सरकारचे कर्तव्य आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
– Which is GOI’s most efficient ministry?
– The secret Ministry for Lies & Empty slogans
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 13, 2021
“कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन महत्वाचं नाही. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
वैक्सीन के लिए सिर्फ़ online रेजिस्ट्रेशन काफ़ी नहीं। वैक्सीन सेंटर पर walk-in करने वाले हर व्यक्ति को टीका मिलना चाहिए।
जीवन का अधिकार उनका भी है जिनके पास इंटर्नेट नहीं है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 10, 2021