टिओडी मराठी, काबुल, दि. 20 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तान देशावर तालिबानने केलेला कब्जा ज्याप्रमाणे जगाला मान्य नाही, त्याचप्रमाणे तिथल्या स्थानिक नागरिकांनी ही मान्य नाही. कारण तालिबानचे वर्चस्व झुगारत गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत विखुरलेल्या निदर्शकांनी देशाचा राष्ट्रध्वज फडकवत निदर्शने केली.
आपल्या सत्तेला वाढत्या विरोधाचा सामना करणाऱ्या दहशतवाद्यांनी नव्याने हिंसाचार करत निदर्शनांना प्रत्युत्तर दिल्याच्या घटना ही समोर आल्यात. याअगोदर अफगाणिस्तानात कठोर शासन लागू केले.
त्यानंतर आता आपण अधिक मवाळ झालो आहे, अशी आश्वासने तालिबानने दिली होती. मात्र, या पाश्र्वाभूमीवर, दहशतवाद्यांनी कुठल्याही प्रकारचे मतभेद दडपून टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.
गुरुवारी देशाच्या स्वातंत्र्यदिनी काबूल विमानतळानजिक मोटारी आणि लोकांच्या एका मिरवणुकीत अफगाणी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ लांब काळे, लाल आणि हिरवे फलक लावले होते.
दहशतवाद्यांचा स्वत:चा झेंडा असल्यामुळे हा फलक त्यांच्याविरुद्धच्या प्रतीक बनत आहे. नंगरहार प्रांतातील ज्या निदर्शनांची दृश्यफीत ऑनलाइन पोस्ट केली. त्यात बंदुकीच्या गोळीने जखमी झालेला निदर्शक रक्तबंबाळ झाला आहे. त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे दिसत आहे.
खोस्त प्रांतमध्ये आणखी एक विरोध हिंसकरीत्या मोडून काढल्यानंतर तालिबानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी २४ तासांची संचारबंदी लागू केली आहे, अशी माहिती येथील परिस्थितीवर विदेशातून लक्ष ठेवून असलेल्या पत्रकारांना मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि समाजमाध्यमांवरील व्हिडीओंनुसार, कुनार प्रांतातही निदर्शक रस्त्यांवर उतरलेत.
अजूनही तालिबानच्या अमलाखाली न आलेल्या देशातील अखेरच्या भागात एकत्र आलेल्या विरोधीनेत्यांनी नॉर्दर्न अलायन्सच्या झेंड्याखाली सशस्त्र विरोध सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे.