TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 ऑगस्ट 2021 – सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सेवा हक्क आयुक्त या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 सप्टेंबर 2021 आहे.

भरती पद –
राज्य सेवा हक्क आयुक्त

आवश्यक अनुभव –
राज्य सेवा हक्क आयुक्त – सरकारी किंवा सार्वजनिक प्राधिकरणातील प्रशासनातील ज्ञान आणि अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठित व्यक्ती.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
सचिव (A.R. O & M) सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 /

ई-मेल आयडी – rts.mumcomm-mh@gov.in

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.