टिओडी मराठी, नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021 – भाजपचे मित्र असलेल्या काही अब्जाधीशांच्या लाभासाठीच केंद्र सरकारने ते तीन कृषी कायदे आणले आहेत, असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
प्रियांका गांधी यांनी अडानी समूहाने हिमाचल प्रदेशातील सफरचंद खरेदीची रक्कम किलोमागे सोळा रुपयांनी घटवली आहे, या बातमीचाही दाखला या अनुषंगाने दिला. यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, शेतमालाच्या किंमती ठरवण्याचे अधिकार अशा मोठ्या भांडवलदारानां मिळाले तर असेच होणार.
कृषी मालाचे भाव भाजपच्या अब्जाधीश मित्रांनाच ठरवण्याचे अधिकार मिळावेत, यासाठीच हे नवे कृषी कायदे आणले आहेत, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी आज ट्विटरद्वारे केला. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार या अब्जाधीश मित्रांच्या हातात जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.