TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, 29 ऑगस्ट 2021 – शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर भाजप आक्रमक झाले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई ,असा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार भाजप नेते कारवाईसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक भाजप नेत्यांनी तक्रारी केल्यात. त्यातच आता मंत्री अनिल परब यांना नोटीस आली आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिलीय.

खासदार संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, शाब्बास !, जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावली आहे. वरचे सरकार कामाला लागले असून या भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता.

अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समजून घ्यावी, असे आवाहन करताना, कायदेशीर लढाई कायदयानेच लढूया, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं.

एकंदरीतच परब यांच्यावर पुढील काळात काय कारवाई होणार?, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.