TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 जून 2021 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीय.

हा महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मानला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहात. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास राहिला नाही का? तुमची मागणी धक्कादायक असल्याचं सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.

जाणून घ्या, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
‘तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्ही सुमारे 30 वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. तर, आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राज्याच्या कारभारावर विश्वास का नाही?, हा धक्कादायक आरोप आहे.