केंद्र सरकार GAS ग्राहकांसाठी सुरु करणार ‘हि’ सुविधा; गॅस Cylinder भरणे होणार सुलभ, वितरकांत होणार स्पर्धा

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 जून 2021 – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकर नवी सुविधा सुरु करणार आहे. याचे नाव ‘डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी’ असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडतील. एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होणार आहे.

या सुविधेमध्ये डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटीद्वारे ग्राहक आपल्या मोबाईल APP किंवा पोर्टलच्या माध्यमातून लॉगीन करुन आपल्या सुविधेनुसार डिस्ट्रिब्यूटर निवडतील. त्यासाठी सर्व डिस्ट्रिब्यूटर्सच्या रेटिंग्स आपल्यासमोर असणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदिगड, कोयंबतूर, गुरगाव, पुणे आणि रांची या शहरात सुरु करणार आहे. त्यानंतर या योजनेचा विस्तार इतर ठिकाणी करणार आहे.

यामुळे ग्राहकांना कमी वेळेत सिलिंडर मिळण्यास मदत होणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूने अधिक ग्राहक मिळावेत म्हणून वितरकसुद्धा सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच चांगले रेटिंग मिळावेत म्हणून प्रयत्न करतील. यामुळे आगामी काळात वितरकांत स्पर्धा सुरु होणार आहे.

Please follow and like us: