TOD Marathi

शिवसेना(Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena Party Chief Uddhav Thackeray called a meeting of party MPs) यांनी पक्षाच्या राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची  बैठक बोलावली आहे. ही बैठक थोड्याच वेळात  होणार आहे. शिवसेनेचे खासदार मातोश्रीवर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, ही बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे. “१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या भूमिकेवर चर्चा करणे हा या बैठकीचा अजेंडा असेल.” दरम्यान शिवसेनेच्या काही खासदारांनी पक्ष नेतृत्वाला एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Presidential Candidate Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यासंदर्भात पत्र लिहिले होते.

यापूर्वी शिवसेनेने एनडीएत असूनही प्रतिभा पाटील (Pratibha Patil) आणि प्रणव मुखर्जी (Pranav Mukherjee) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये शिवसेनेने एनडीए (NDA) सोडली आणि जुना मित्रपक्ष भाजप सोडून महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मू यांना पक्षाने पाठिंबा देण्याची मागणी केली होती.

एनडीएने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना त्यांचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) 18 जुलै रोजी होणार आहे.