TOD Marathi

मुंबई :
विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. (Supreme Court ordered Speaker of assembly) शिवसेना आमदार अपात्रतेबाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्या वतीने सरन्यायाधीशांकडे सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

हे प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक आहे. यावर उद्याही सुनावणी होण्याची शक्यता नाही. या विषयावर सुनावणी होईपर्यंत आमदारांवर निर्णय किंवा कारवाई नको, अशा सूचना विधासभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.

शिवसेनेच्या वतीने वकिलांनी या विषयावर सुनावणी घेण्याची मागणी केली होती, ती मागणी कोर्टाने नाकारली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनीही ही मागणी केली होती, मात्र तातडीने सुनावणी करण्याबद्दल असलेली मागणी नाकारत या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठ नेमणार, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्याबरोबरच खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागेल असेही म्हटलेलं आहे. शिंदे गटाला हा मोठा दिलासा मानला जातो. (Relief to Shinde Group)