TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 जुलै 2021 – देशात करोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही. देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत देशात अनेक राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. तसेच व्हेंटिलेटर्स कमी पडत होते. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांनाचा मृत्यू होत आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याबाबतील एक अनुभव मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी रात्री माध्यमांना सांगितला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता तेव्हा मी सात दिवस झोपलेलो नाही. माझ्याकडे माहिती यायची रुग्णालयातील ऑक्सिजन अवघ्या काही तासात संपणार आहे. मग, आम्ही सर्व ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत होतो.

‘मी त्या काळात स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलत होतो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत?, किती वेळ लागेल? वगैरे माहिती घ्यायचो’, असं चौहान म्हणाले.