TOD Marathi

मुंबई : “शिवेसेनेसाठी तुम्ही गेली १५ ते १८ वर्ष काम करत आहात. पक्षासाठी आणि मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे लढत आहात. आपल्यावरील कारवाई ही नजरचुकीने झाली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच शिरुर मतदारसंघात दौरा करणार आहे. तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता तयारीला लागा”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितले. (Shivsena party chief Uddhav Thackeray spoke with Shivajirao Adhalrao)
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. यावेळी आढळरावांसोबत जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे देखील होते. दोन-तीन दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त ‘सामना’मध्ये छापून आलं होतं. (A news of suspension of Shivajirao Adhalrao published in Saamna) शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी तो सर्वांत मोठा धक्का होता. आढळरावांच्या थेट भूमिकेने नजरचुकीने कारवाई बातमी छापून आल्याचं ‘सामना’ने स्पष्ट केलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली.

“मी गेली १८ वर्ष शिवेसेनेचं प्रामाणिकपणे काम करतोय. जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असताना त्यांच्यासमोर निकाराने लढा देतोय. मग माझं काय चुकलं?” असा उद्विग्न सवाल आढळराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर, “आपण काळजी करु नका. आपला प्रामाणिकपणा आम्हास ठाऊक आहे. कोरोना काळात तर आपल्या कामाची राज्याला दखल घ्यावी लागली. चक्रीवादळ, विविध नैसर्गिक आपत्तीत आपण मदतीसाठी नेहमी पुढे असता. आपण असाच शिवसेनेचा भगवा घेऊन चाला, तुमच्या सोबत मी आहे. लवकरच शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार आहे. तोपर्यंत तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता तयारीला लागा”, असंही उद्धव ठाकरे आढळरावांना म्हणाले.