Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.

TOD Marathi

नागपूर : “देवेंद्र रात्री वेषांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे. यादरम्यान वेगळाच पोशाख करुन, डोळ्यावर मोठा गॉगल लावून ते घराबाहेर पडायचे. मलाही ओळखू यायचे नाहीत”, असा मोठा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी केला. (Amruta Fadnavis revealed the secret of meeting between Devendra Fadnavis and Eknath Shinde) सत्तासंघर्षाच्या काळात सगळे आमदार झोपल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायचो, असं विधानसभेत केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलं होतं.आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत आज अमृता फडणवीसांनी नवा गौप्यस्फोट केलाय.
सत्तासंघर्षादरम्यानचे अनेक किस्से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात सांगितले आणि त्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात झाली. (Eknath Shinde speech in Vidhansabha) आमच्यातील वाटाघाटीसाठी आणि चर्चांसाठी सगळे आमदार झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो, चर्चा करायचे आणि आमदार झोपेतून उठायच्या आतमध्ये मी हॉटेलवर यायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सांगितलं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीस म्हणाल्या की, “देवेंद्र साधारण खूप रात्रीपर्यंत काम करतात. दरम्यानच्या काळात जॅकेट वगैरे घालून ते घराबाहेर पडायचे. डोळ्यावर चष्मा वगैरे घालायचे. मलाही कधीकधी ओळखायला यायचं नाही. त्यावर मी त्यांना विचारलंही, की नवीन काही सुरु आहे का? तर उत्तर न देता ते प्रश्न टाळायचे. पण मला वाटायचं की काही ना काही मोठी राजकीय घडामोड सुरु आहे”.
“एकनाथ शिंदे यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. त्यावरुन असं लक्षात येतं की आमदारांमध्ये किती अनरेस्ट होता. त्यामुळे कुठे ना कुठे तो अनरेस्ट निघणारच होता. मग भाजपने त्याला वाट मोकळी करुन देण्याचं काम केलं आणि देवेंद्र त्यांच्यामागे उभे राहिले आहेत, तर ते चांगलंच आहे”, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

विधानसभेत बोलताना काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

देवेंद्र फडणवीस आणि मी कधी भेटायचो हे आमच्या आमदारांनाही माहिती नव्हतं. सगळे आमदार झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि आमदार उठायच्या आधी पुन्हा हॉटेलवर परतायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना म्हटलं. मुख्यमंत्री शिंदे यांची ही स्टोरी ऐकून देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला होता.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज