TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जुलै 2021 – बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. राज हॉटशॉट नामक एका ब्रिटीश कंपनीसाठी पॉर्नपटांची निर्मिती करत आहे, अशी माहिती समोर आहे. यादरम्यान अशा अश्लील व्हिडीओंसाठी मॉडेल सागरिका शोना सुमन हिला ही विचारलं होतं. परंतु तिने वेळीच सावध होत यास नकार दिला होता.

राज कुंद्राला अटक होताच सागरिका प्रसार माध्यमांसमोर आली अन् तिने या प्रकरणी अनेक खुलासे केले. राज कुंद्रा पॉर्न चित्रपटांची निर्मिती करतो. तिला हि अशा चित्रपटांची ऑफर मिळाली होती. तिला ऑनलाईन ऑडिशन देण्यासाठी सांगितलं होतं.

याशिवाय नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओंची मागणी केली होती. मात्र, तिने यासाठी नकार दिला होता. त्यावेळी राज कुंद्रा याने सागरिका शोना सुमन सोबत फोनवर संभाषण केलं होतं. अत्यंत अश्लील शब्दात तो तिच्याशी बोलत होता, असे खळबळजनक दावे तिने केलेत.

राज कुंद्रा विरोधात पुरावे शोधण्यासाठी सागरिका पोलिसांना मदत करणार आहे. मला ही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावं. जर मला हे इतके मोठे रॅकेट आहे याचा अंदाज आला असता तर त्यांचे कॉल व व्हिडीओ मी रेकॉर्ड करून ठेवले असते.

पण, हरकत नाही व्हॅट्स अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये नक्कीच ते सापडतील. या रॅकेटबद्दल शिल्पा शेट्टी हिला ही नक्कीच माहित आहे. कारण फोनवर बोलताना ते तिच्याबद्दलही बोलत होते.असा दावा सागरिकाने केलाय.