TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 जुलै 2021 – पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक झालेला उद्योगपती राज कुंद्रा आण बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे आता सेबीच्या रडारवर आहेत. सेबीने शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्यावर कारवाई केलीय. बुधवारी Securities and Exchange Board of India (SEBI) कडून यांच्यावर कारवाई केली आहे.

शिल्पा आणि राज यांच्यासोबत वियान इंडस्ट्रीजला शेअर्स ट्रेडिंगमध्ये अंतर्गत व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी मानत 3 लाख रुपयांचा दंड आकारलाय.

सेबीने बुधवारी कारवाई करत अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा आणि वियान इंडस्ट्रीजवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. सेबीच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी वियान इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग बाबत चौकशी केली. यापूर्वी या कंपनीचे नाव हिंदुस्तान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड असे होतं.

सेबीने केलेल्या चौकशीत असे आढळलं की, 1 सप्टेंबर, 2013 ते 23 डिसेंबर 2015 दरम्यान राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वियान इंडस्ट्रीजने सेबीच्या नियमन क्रमांक 7(2) (a) आणि 7(2) (b) च्या तरतुदींचे उल्लंघन केलंय.

सेबीने आदेशामध्ये म्हटल्याप्रमाणे, 29 ऑक्टोबर 2015 रोजी चार व्यक्तींना कंपनीकडून 5 लाख इक्विटी शेअर्सचं वाटप केलं. शिल्पाला प्रत्येकी 1,28,800 शेअर वाटप केलं होतं.

सध्या राज कुंद्रा तुरूंगात :
मंगळवारी न्यायालयाने उद्योगपती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावलीय. आता मुंबई न्यायालयामध्ये राजच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली.

राज कुंद्राचा जामीन अर्ज नायायालयाकडून फेटाळला आहे. त्यामुळे या सुनावणीत राज याला मोठा झटका बसलाय. त्यामुळे राज कुंद्रा अजून पोलिसांच्या कोठडीत असणार आहे.