TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – पती  राज कुंद्राला अटक केल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्‌टीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या सर्व प्रकरणावर शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये तिच्या मनातील खुसमट सांगण्याचा प्रयत्न केलाय. या पोस्टमधून तिने येणारी सर्व आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे संकेत दिेलेत.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर सॉफ्ट पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रावर सॉफ्ट पॉर्न चित्रपट बनविण्यासह तो ऍपवर अपलोड करण्याचाही आरोप केला आहे.

शिल्पा शेट्टी लवकरच ‘हंगामा-2′ चित्रपटामध्ये झळकणार आहे. प्रणिता सुभाष यांनी नुकताच या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यानंतर ट्रोलर्सने शिल्पावर निशाणा साधला आहे. ‘हंगामा हो गया.’ या गाण्यामध्ये प्रणिताशिवाय शिल्पा शेट्‌टी, मीजान आणि परेश रावल आहे.

शिल्पाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, भविष्याकडे पाहतानाही आपण अशा भीतीने जगतो की माझी नोकरी जाईल. माझ्या जवळच्या व्यक्तीचे निधन होईल. मात्र, असा विचार न करता आपण नेहमी वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. यातून तिने आपण खंबीर आहे, असं सांगितलं आहे.