TOD Marathi

Google 30 सप्टेंबर पासून बंद करणार गुगल Bookmarks ;16 वर्ष जुनी होती हि सर्व्हिस, User ला दिली सूचना

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 23 जुलै 2021 – जगात सर्वांत अधिक प्रमाणात गुगल सर्च इंजिन वापरलं जात आहे. अनेक बाबींचा शोध आणि त्याबाबत माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. त्यामुळे गुगल युजर्ससाठी हे अपडेट बातमी महत्वाची आहे. कारण गुगल स्वतःच एक जुनं फीचर लवकर बंद करणार आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी गुगल बुकमार्क्स हे फीचर सर्व युजरसाठी बंद करणार आहे, अशी घोषणा केली आहे. गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर याबाबत सूचना दिली आहे.

Google Bookmarks ही 16 वर्ष जुनी सुविधा मात्र, फारशी लोकप्रिय झाली नसल्यामुळे हि सुविधा आता सर्व युजर्ससाठी बंद होणार आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. याची सूचना गुगलने बुकमार्क्स पेजवरील बॅनरच्या माध्यमातून दिलीय.

बुकमार्क्ससवरील सर्व डेटा गुगलने युजर्सला एक्सपोर्ट करायला सांगितलाय. यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जात Export Bookmarks वर क्लिक करावे. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी करता आहे. ही सुविधा बंद होणार आहे, त्याचा परिणाम गुगल मॅप्सवर होण्याची शक्यता आहे.

गुगल बुकमार्क्स बंद झाल्यावर गुगल मॅप्सवरील काही फीचर्सबाबत अडचणी उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, हे फीचर बुकमार्क्सशी संबंधित व सिंक आहेत.

गुगल मॅप्सवर युजर्स आपल्या आवडत्या ठिकाणांचा डेटा एका लिस्टमध्ये एकत्रित ठेवू शकतो व नंतर तो पडताळू शकतो. जर एखाद्या वेबसाईटवर गुगल मॅप्सवर एम्बेडेड मॅप्स असेल तर, युजर तो गुगल मॅप्सवर सेव्ह करु शकतो.

यासाठी त्या वेबसाईटवर क्लिक करुन हव्या असलेल्या ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी मॅपवरील त्या ठिकाणावर क्लिक करावे. त्यानंतर सेव्हवर क्लिक करुन लिस्ट निवडावी. स्टार व वेबसाइटचे नाव तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाईलवर दिसेल.