Raj Kundra Pornography case : ‘वो’ Link कहा है?; Raj Kundra च्या अटकेनंतर Social Media वर मीम्सचा पाऊस, London मधून HotShots द्वारे सुरु होता ‘हा’ उद्योग

टिओडी मराठी, दि. 21 जुलै 2021 – पॉर्न फिल्म्स उद्योगाप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. लंडनस्थित भावोजीच्या सहकार्याने ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपच्या माध्यमातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योजक राज कुंद्रा याने पॉर्न फिल्मचा उद्योग केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांना राज कुंद्राच्या कार्यालयामध्ये पॉर्न फिल्म्सबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यानंतर त्याला आणि त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प याला सोमवारी रात्री अटक केली होती.

उद्योजक राज कुंद्राला अटक केल्यानंतर नेटकऱ्य़ांनी लिंक मागण्यास सुरूवात केली आहे. यावरून ‘वो’ लिंक कहा है?, यांसह अनेक मीम्स सोशल मीडियावर पाऊस पडत आहे.

तसेच यावरून सोशल मीडियावर उद्योजक राज कुंद्राला ट्रॉल केलं जात आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील सोशल मीडियाव्दारे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

शिल्पा शेट्टी हि राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. हि त्याच्या या उद्योगात साथ देत होती का? तिचा यात सह्भाग होता का? तिने देखील अनेक मॉडेल यांना फोन केले होते, त्यामुळे शिल्पा शेट्टीकडे देखील संशयाची सुई फिरत आहेत.

यामुळे आता बॉलिवूड किती गढूळ होत आहे? याचा अंदाज येत आहे. नव्या मॉडेल यांना जाळ्यात ओडून अशाप्रकारे फसविण्याचा प्रकार केला जात होता, हे समजून येत आहे.

Please follow and like us: