टिओडी मराठी, लातूर, दि. 1 जून 2021 – बियाणे हे शेतकऱ्याच्या जिवनातील म्हत्वाचा भाग आहे. विना तक्रार जर शेतकरी ‘त्या’ कंपन्यांची बियाणे घेत असेल तर, बियाणे उत्पादक कंपन्यानी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमतेची हमी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटना लातूरचे जिल्हध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे.
राजकुमार सस्तापुरे यांनी सांगितले कि, प्रत्येक वर्षी शेतकरी उत्पादनात वाढ व्हावी आणि एकरी उतारा जास्त यावा म्हणून पेरणीसाठी घरच्या बियाण्यापेक्षा शेतकरी सिडफलॉट केलेले कंपनीचे बियाणे खरेदी करीत आसतो. पण, कंपन्या देखील सिडफलॉट कमी आणि खुल्या बाजारातून अधिक सोयाबीन खरेदी करुन गुणवत्ता नियंत्रक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बियाणे प्रमाणित करुन घेतात, असे भोगस बियाणे कंपन्या वाटेल त्या मनमानी भावाने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत.
यात आता शेतकरी प्रोड्युसर कंपन्याची भर पडली आहे. प्रोड्युसर कंपन्याही असेच बाजारात सोयाबीन खरेदी करुन अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करुन आपल्या कंपनीच्या नावाने बियाणे विक्रीचा गोरखधंदा करत आहेत.
मागील वर्षी अधिक प्रमाणात सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे करोडो रुपयाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला.
आनेक शेतकऱ्यांनी या कंपन्याच्या विरोधात तक्रारी देखील केल्या. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही कंपन्यानी काही शेतकऱ्यांना बियाणे देऊन तोंडाला पाने पुसण्याचा कार्यक्रम केला. तर काही कंपन्यांनी तर या तक्रारीची दखल सुध्दा घेतली नाही.
याबाबत शासन स्तरावरही काही ठोस कारवाई कंपन्यांवर केली गेलेली नाही. काही कंपन्यांचे तातपुरते लाइसेन्स रद्द करण्याचे नाटक केले जाते. पण, एकाही कंपनीला शेतकऱ्यांची नुकसानभरपाई द्या, असे आदेश शासनाने दिलेले नाहीत.
पेरणीच्यावेळी बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्याच्या हातातून हंगाम निघून जातो. वर्षाचे नियोजन बिघडते, बियाणे हे शेतकऱ्याच्या जिवनातील म्हत्वाचा भाग आहे. त्यामुळे कंपन्या बियाण्याच्या बॉगच्या किंमती फिक्स ठरवतात, यात एक रुपया देखील कमी करत नाहीत.
शेतकरी विना तक्रार पैसे देऊन हे बियाणे घेतात मग, कंपन्यांनी देखील ते बियाणे उगवन क्षमतेची हमी शेतकऱ्यांना का देऊ नये. ती हमी शेतकऱ्यांना दिली जावी, असेही लातूरचे जिल्हध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी म्हंटले आहे.