TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 1 जून 2021 – प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत म्हणून सहज उपलब्ध होणाऱ्या दूध पदार्थाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेकडून 1 जून हा दिवस जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. याची सुरवात 2000 सालापासून केली आहे.

दूध हे अनेकांच्या दररोजच्या आहाराचा भाग आहे. दूध अथवा विविध प्रकारची दूध उत्पादने अधिक प्रमाणावर वापरली जातात. लहान बाळापासून ते अतिवृद्ध देखील दूधाचा वापर करतात.

या निमित्ताने जगभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र १ जून २०२१ या जागतिक दूध दिवशी करोनाचा उपद्रव लक्षात घेऊन हे कार्यक्रम सोशल मिडियाच्या माध्यमातून केले जावेत, असे आवाहन केले आहे.

दरवर्षी हा कार्यक्रम एक थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. २०२१ साठी पर्यावरण, पोषण व सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरण यासह डेअरी क्षेत्रात स्थैर्य अशी थीम आहे.

दूध हा शरीर पोषणाचा चांगला स्रोत आहे. जगात १ अब्जाहून अधिक नागरिकांच्या उपजीविकेचे ते महत्वाचे साधन आहे. दूध आणि दुधापासून बनणारी डेअरी उत्पादने जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. भारतासाठी हा दिवस महत्वाचा आहे, कारण जगात मोठे दूध उत्पादन करणारे जे देश आहेत त्यात भारताचा नंबर टॉपला आहे.

दूधाचे आठ प्रकार :
बालकाचा पहिला आहार दूध हाच असतो. भारतात सुद्धा फार प्राचीन काळापासून दूधाचा वापर आहारात होत आहे. आयुर्वेदाने दूधाचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यात गाय, म्हैस, बकरी, उंट, गाढव, घोडी, आणि स्त्री यांच्या दूधाचा समावेश आहे.

यात सर्वात उत्तम दूध म्हणजे मातेचे दूध मानले जाते. त्यानंतर गाय, बकरी, म्हैस यांच्या दुधाचा क्रमांक लागतो. उंट, गाढव, घोडी यांचे दूध औषध म्हणून वापरले जाते मात्र, हे सहज उपलब्ध होत नाही.