TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 मे 2021 – कोरोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात पहिली, दुसरी, तिसरी अशी कोरोनाची लाट आली आणि गेली देखील. त्यावर त्यांनी योग्य प्रकारे मात केली. भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, हि लाट कशी आली? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याचे कारण सांगितले आहे. त्यांच्यानुसार, तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे लागण होण्याचे प्रमाण वाढले, अन देशात कोरोनाची दुसरी लाट आली.

तरुणांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे का? असा प्रश्न विचारला असता आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले कि, ‘पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यात वयात जास्त फरक असल्याचे दिसत नाही.

प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक अधिक असुरक्षित असतात’. ‘तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. कारण, अचानक त्यांना घऱाबाहेर पडण्यास सुरुवात केली. याशिवाय देशात करोनाच्या विषाणूचा नवा प्रकार आढळत आहे. त्याचाही परिणाम झालेला असू शकतो,’ असे बलराम भार्गव यांनी सांगितले.

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलाय. दरम्यान, १६ राज्यांत ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब यांचा समावेश आहे तिथे रुग्णसंख्या वाढत आहे. तरी ही देशात मात्र सध्या करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत असल्याचे आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश व तेलंगणा हे त्या १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आहेत, जिथे दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ किंवा घट होत आहे.

दरम्यान, १६ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. यात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. पंजाब, आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.