मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊतांच्या घरी ED ची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणीसंजय ( Patra Chal case ) राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता राऊतांवर नक्की काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालं आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. (Sanjay Raut On Twitter )
याप्रकरणी आता स्वत: संजय राऊत यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणालेत की, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.
तसेच खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र, असं म्हणत त्यांनी ईडीच्या कारवाईला सामोरं जायचं ठरवलंय.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..
मी शिवसेनेसाठी लढत राहीन.— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022