“फडणवीस मला अमित शाहांकडे घेऊन गेले अन् माझं ईडीचं मॅटर क्लिअर झालं”

मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी आज दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर ( Rebel MLA ) जोरदार हल्लाबोल केलाय.  यात सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय तो प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) आणि यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांच्याविरोधात.  संजय राऊत म्हणालेत, मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस (S8upreme Court Case ) आहे म्हणून आलो आहे.

त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, ‘देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadanvis ) मला भेटले इथं. ते मला अमित शाहांकडे (Amt Shaha ) घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लिअर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली.’, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर देखील किरीट सोमय्या 0यांनी आरोप केले होते. मात्र ते दोघेही दिल्लीला गेले आणि त्यांनाही वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि ते स्वच्छ झाले. ते सूरतवरुन थेट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे. हा कोणता ब्रँड आहे. ईडीची कारवाई माझ्यावरही झाले. माझं घर जप्त केलं. माझी वडिलोपार्जित जमीन जप्त केली. मी तरीही गुडघे टेकले नाहीत. ज्या दिवशी माझ्या घरावर रेड पडल्या त्यावेळी मी दिल्लीत होतं.  मी रात्री 12 वाजता फोन करुन अमित शाहांना सांगितलं की, माझ्यासाठी माझ्या आसपासच्या लोकांना त्रास देऊ नका. हिंमत असेल तर मला अटक करा. अजूनही मला अटक करण्याचे प्रयत्न आहेत, असंही ते म्हणाले.

Please follow and like us: