“भावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे”; परळीतल्या बॅनरची राज्यभर चर्चा

परळी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Rebel Shivsena Leader Eknath Shinde ) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना पहायला मिळत आहेत. शिंदे यांच्यासोबत ३०- ४० आमदार (MLA) असल्याचा दावा केला जातोय. शिंदे यांच्या बंडाळी नाट्यामुळं राज्यातील महाविकास आघाडीचं (MahaVikasAghadi ) सरकार संकटात आलंय. तर  राज्यात शिवसेना विरुद्ध बंडखोर आमदार (Rebel VS MLA) असा सामना चांगलाच रंगत धरत आहे. शिवसैनिकांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.  पण बीड जिल्ह्यात चर्चा आहे ती एका बॅनरची.

परळी तालुक्यातील (Parali) सिरसाळा या गावी मौलाना आझाद आर्थिक महामंडळचे माजी सदस्य नसीब शेख यांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थनात पोस्टर लावत त्यावर ‘भावी उपमुख्यमंत्री’ म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे बॅनर (Eknath Shinde Banner ) आणि त्यावर उपमुख्यमंत्री असा करण्यात आलेला उल्लेखामुळं पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आलाय.

हे बॅनर लावल्यानंतर शिवसैनिक आणि जिल्ह्यामध्ये या बॅनरची चर्चा सुरू आहे. बॅनर लागल्यामुळे बीडमध्ये गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या माध्यमातून शिंदे समर्थक आक्रमक झाले असून एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी प्रदर्शन करत आहेत. तर, कट्टर शिवसैनिक हे शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आता ही राजकीय खेळी नेमकं काय वळण घेणार हे पाहणे गरजेचे आहे.

 

Please follow and like us: