“छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये”; राऊतांचा भाजपला टोला

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचंही राऊत यावेळेस म्हणाले.

तसेच या राज्यात विरोधी पक्ष आहे मात्र तो केवळ विरोधासाठी विरोध करत आहे असं चित्र दिसतंय. एखादा निर्णय घेतला की ते त्यावर टीका करत सुटतात. असुरी आनंद मिळतो कुणास ठाऊक अशी बोचरी टीकाही राऊत यांनी या वेळेस भाजपवर केली.

Please follow and like us: