टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – रशियाने ‘स्पुतनिक लाइट’ ही नवी कोरोना लस बनविली आहे. तसेच तिच्या आपत्कालीन वापरास पुतीन सरकारने मान्यता दिली आहे. ‘स्पुतनिक लाइट’ लस एका डोसची असून ती 80 टक्के प्रभावी आहे, असा दावा रशियाने केला आहे. रशियाने याअगोदर बनविलेली ‘स्पुतनिक व्ही’ लस भारतातील लसीकरण मोहिमेत आता वापरण्यात येणार आहे.
जगात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लस दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस ‘स्पुतनिक व्ही’पेक्षा अधिक प्रभावी आहे. ‘स्पुतनिक व्ही’चे दोन डोस घेतल्यानंतर ती लस कोरोनावर 91.6 टक्के प्रभावी ठरत आहे. मात्र, ‘स्पुतनिक लाइट’चा एकच डोस घेतल्यानंतर ही लस ७९.४ टक्के परिणामकारक आहे, असे आढळून आले आहे.
28 दिवसांनी विकसित होतात अँटिबॉडी
‘स्पुतनिक लाइट’ लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी अँटिबॉडी विकसित होत आहेत. ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये रशियाने व्यापक लसीकरण मोहीम राबविली आहे. त्यात ‘स्पुतनिक लाइट’ लस रशियातील नागरिकांना दिली आहे.
More Stories
मुस्लिम देशांनी भारताची केली कोंडी; मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा ‘या’ देशांकडून निषेध
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट?; कलम 144 लागू
जगप्रसिध्द जॉनी-एम्बर मानहानीच्या खटल्यात जॉनी डेप विजयी, निकालाचे जगभरातून स्वागत