TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं आढळत आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या वाढली आहे. राज्यात मागील 24 तासांत 48 हजार 401 नवे कोरोना रुग्ण आढळले असून राज्यात आज 60 हजार 226 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय.

राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ८६.४ टक्के इतकं झालंय. यात मुंबईने लक्षवेधी कामगिरी केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९१ टक्क्यांवर गेलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं दिसून येत आहे.

राज्यात आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आज ५७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे.

सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर, २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. महाराष्ट्र राज्यात आज एकूण ६ लाख १५ हजार ७८३ सक्रीय रुग्ण आहेत.