TOD Marathi

भारताने पाकिस्तानवर अखेरच्या षटकात दमदार विजय मिळवला पण भारताने हा सामना कसा जिंकला? (IndvsPak Cricket Match) याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Captain Rohit Sharma) एका वाक्यात सामना संपल्यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही अशाच टीमवर विश्वास ठेवू इच्छितो, तुम्ही सामन्यात कुठेही नसाल. विजयाची शक्यता दुरापास्त असेल किंवा विजयापासून लांब असाल, पण तरीही जर तुम्ही विजय मिळवता हे सर्वात महत्त्वाचे आहे.’ माझ्या मते खेळाडूंवरील विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्याला सामन्यात नेमकं काय करायचं आहे, ते त्यांना सांगण्यात आलं होतं त्यामुळे खेळाडूंना नेमकं काय करायचं याची स्पष्टता देण्यात आली. त्यामुळे या सामन्यात आम्ही रनणीती आखली आणि त्यामध्ये यशस्वी ठरलो.

सामन्यानंतर बोलताना रोहितने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. (Rohit Sharma talks about match) पण, सर्वात महत्त्वाचा एक शब्द त्यांनी सांगितला आणि तो म्हणजे ‘विश्वास.’ जेव्हापासून रोहित संघाच्या कर्णधार झालाय, तेव्हापासून त्याने खेळाडूंवर विश्वास ठेवला आणि त्याचाच परिपाक या सामन्यात पाहायला मिळाला. भारत आणि पाकिस्तानचा सामना चांगलाच चुरशीचा रंगला आणि या रंगतदार सामन्यात भारताचा विजय झाला. या सामन्यात कधी भारताची तर पाकिस्तानची बाजू मजबूत होती. अखेरच्या शतकापर्यंत सामना गेल्यावर नक्की कोण विजयी ठरेल? याचाही अंदाज बांधणं कठीण होतं. त्यामुळे या सामन्याचे श्रेय कुणाला द्यायचं हाही प्रश्न अर्थात रोहित पुढे असेल. रोहितने मात्र यावेळी एका शब्दात भारताच्या विजयाचे कारण सांगितलं.

हार्दिक पांड्यासाठीही हा सामना खास ठरला. साधारण एक वर्षापूर्वी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पाकिस्तानने भारताचा पहिल्यांदा 10 विकेटने पराभव केला होता आणि आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारताचा पाकविरुद्ध तो पहिला पराभव होता त्यामुळे जिव्हारी देखील लागला होता. त्या सामन्यामध्ये ज्यांना विलन ठरवण्यात आलं होतं त्यामध्ये हार्दिकचाही समावेश होता. आज दुबईच्या त्याच मैदानावर आशिया कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत वचपा काढला. आणि विजयाचा हिरो ठरला गेल्या वेळचा विलन हार्दिक पांड्या (Hardik Pandya). त्यामुळे हार्दिकसाठीही हा सामना महत्त्वाचा ठरला.