TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 मे 2021 – कोरोनाग्रस्त रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात. कोरोनाग्रस्त व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केलीय.

कोणतीही लक्षणे नसलेल्या बाधित व्यक्तीकडून हि कोरोनाचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेऊन लोकांनी मास्क वापरावेत, अशी सूचना केली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या गाईडलाईनमध्ये असं म्हटलंय की, ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांच्याकडून संसर्ग होऊ शकतो. सरकारने वेंटिलेशनची विशेष काळजी घ्यावी. चांगल्या वायुवीजन असलेल्या ठिकाणी संसर्ग पसरवण्याचा धोका कमी असतो. पंखे योग्य ठिकाणी लावा आणि दारे, खिडक्या थोड्या उघड्या ठेवा.

सध्या लोकांनी डबल मास्क किंवा एन -95 मास्क घालायचा सल्ला दिला आहे. सर्जिकल मास्कसह आणखी एक मास्क घालता येऊ शकतो. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क घालावेत. याशिवाय दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड, टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्‍या वस्तू स्वच्छ कराव्यात.

मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा असलेल्या इमारतींत एअर फिल्टरेशन कार्यक्षमता सुधारणे उपयुक्त ठरते. कार्यालये, सभागृह, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये गॅबल फॅन सिस्टम आणि रूफ व्हेंटिलेटर्स वापरण्याची शिफारस केली जाते.