TOD Marathi

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) लक्ष्मी सहकारी बँकेचा (Lakshmi Cooperative Bank) परवाना रद्द केला असून बँक पुन्हा सुरू होण्याची आशा कायमची मावळली आहे. आरबीआयने (RBI) ही कारवाई केली असून बँकेच्या वेबसाइटवर (Bank Website) त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बँक आता अवसायनात निघाली असून सहकार आयुक्तांकडून लवकरच बँकेवर अवसायकाची नियुक्ती होईल.

थकीत कर्ज वसूल करून पाच लाखांवरील ठेवीदारांना ठेव रक्कम वाटपाची जबाबदारी अवसायकावर राहणार आहे. बँकेच्या प्रशासक मंडळाकडून थकीत कर्ज वसूल करून बँक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच बँकेचे विलीनीकरण दुसऱ्या बँकेत करण्याची प्रक्रियादेखील सुरू होती. बँकेचा परवाना रद्द (Bank License Canceled) झाल्याने बँक पुन्हा सुरू होण्याची आशा कायमची मावळली आहे. त्यामुळे बँक आता दुसऱ्या बँकेत विलीन होऊ शकते. बँकेच्या प्रशासक मंडळांनी पुण्यातील (Pune) काही बँकांशी याबाबत प्राथमिक बोलणे देखील केली असून आता एका बँकेने लक्ष्मी बँक विलीन करून घ्यायला मंजुरी दिली आहे. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर विमापात्र ठेवीदारांकडून क्लेम दाखल करून घेतले. महामंडळाकडून ठेव रक्कम मंजूर झाल्यानंतर तीन टप्प्यांत रकमेचे,वाटप झाले, पहिल्या टप्प्यात सोळा हजार ठेवीदारांच्या २८ हजार खात्यांवर १८० कोटी विमापात्र ठेव रकमा मिळाल्या. तर दुसऱ्या टप्प्यात साडेतीन हजार ठेवीदारांच्या खात्यावर सहा कोटी ६३ लाख रुपये विमापात्र ठेव जमा झाले.

बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे बँकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. तसेच बँकेचे कामकाजदेखील आता नाममात्र राहील. बँकेतील थकीत कर्ज वसूल करून पाच लाखांवरील ठेवीदारांना ठेव रक्कम परत करण्यासाठी हे कामकाज सुरू राहील.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज