TOD Marathi

मुंबई : दसरा मेळावा ( Dasra Melava ) कुणाचा? हा प्रश्न गेले काही दिवस चर्चेत आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मात्र यावर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्यांचेच कधी काळचे सहकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेचे (Shisena) काही पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले. 40 आमदार 12 खासदार हे आधीच त्यांच्यासोबत होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाची? हा प्रश्न न्यायालयात गेला, निवडणूक आयोगात देखील गेला. ही सगळी प्रक्रिया होईल किंवा शिवसेना कोणाची यावरच उत्तर हे सर्वोच्च न्यायालय देईल. मात्र, पुन्हा एक वाद मुंबईत सुरू होता तो म्हणजे दसरा मेळाव्याबाबत.

दसरा मेळावा आमचाच होईल अशी वक्तव्य दोन्ही गटाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) पोलिसांकडून अहवाल दिला होता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटांचे अर्ज मुंबई महानगरपालिकेने नाकारले होते. त्यानंतर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढे सदा सरवणकर यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई महापालिका अशा तीनही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि कोर्टासमोर युक्तिवाद केला. ही सुनावणी पार पडल्यानंतर निकालपत्राचे वाचन सुरू झालेले आहे. आणि स्थानिक आमदार शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा आज नाही असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली असली तरी उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी कोर्ट परवानगी देणार का? याकडे देखील सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे.