TOD Marathi

टिओडी मराठी, जेरुसलेम, दि. 16 मे 2021 – सध्या कोरोनामुळे अनेक देश विशेष काळजी घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून देश-विदेशातील लोक वेगवेगळे नियम लागू करत आहेत. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणं आवश्यक आहे. आता मात्र, कोरोनामुळे परदेशात जायचं असे तर व्हॅक्सिन पासपोर्ट जवळ असणं गरजेचं आहे. इस्राईल देशाने हि व्यवस्था सुरु केली आहे.

व्हॅक्सिन पासपोर्ट हा पासपोर्ट म्हणजे असे प्रमाणपत्र आहे की, जो तुम्ही कोव्हिड-19 विरुद्ध सुरक्षा कवच धारण केले आहे, असे सिद्ध करतो. व्हॅक्सिन पासपोर्ट हा ई-पासपोर्ट तुमच्या मोबाईवर तुम्हाला प्राप्‍त होतो.

रेस्टारंट, पब, बार, क्रीडा संकुल, जीम, मॉल, चित्रपटगृहे अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना हा व्हॅक्सिन पासपोर्ट तुम्हाला उपयोगी पडेल.

जर तुम्हाला विनासायास प्रवेश मिळतो. ज्यांनी लसीकरण करून घेऊन स्वत:ला कोरोनापासून संरक्षित केले आहे, अशा लोकांना हा व्हॅक्सिन ई-पासपोर्ट मिळतो. इस्राईलने ही व्यवस्था सुरू केलीय.

इंग्लंडमध्ये असा व्हॅक्सिन ई-पासपोर्ट सुरू करण्याचा विचार होता; परंतु तेथे याला विरोध केला आहे. यामुळे समानतेचा अधिकार हिरावून घेतला जातो, असे काहींचे म्हणणं आहे.