शास्त्रज्ञ Albert Einstein यांच्या पत्राला 3 कोटींची बोली!; विकत घेणाऱ्याला मिळणार ‘हे’ फायदे

टिओडी मराठी, दि. 16 मे 2021 – जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एक हस्तलिखित पत्र सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. कारण, या पत्रात आईनस्टाईन यांनी लिहिलेले भौतिकशास्त्र विषयाचे जगविख्यात सूत्र आहे. त्यामुळे अत्यंत दुर्मीळ अशा या पत्राचा लिलाव होत आहे. त्याला सुमारे तीन कोटी रुपयांची बोली लावली आहे. येत्या 20 मेपर्यंत या पत्राचा लिलाव सुरू राहणाराय.

आईनस्टाईन यांनी चार महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत त्यातील E= mc2 हा एक सिद्धांत आहे. वस्तुमान व ऊर्जा यांच्यात एक सूत्र त्यांनी बनवले होते. ते सूत्र जगात प्रसिद्ध झाले होते. तेच सूत्र आईनस्टाईन यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये 26 ऑक्टोबर 1946 रोजीच्या पत्रात लिहिलेलं आहे.

या पत्राचा लिलाव बोस्टन येथील आर.आर. ऑक्शन हाऊसच्या वतीने आयोजित केला आहे. आईनस्टाईनने हा जगप्रसिद्ध सिद्धांत केवळ चार पनांत लिहिलेला आहे.

त्यामुळे या पत्राचे मूल्य अधिक असून हे आईनस्टाईन यांचे खाजगी पत्र आहे. ते प्रिन्स्टोन युनिव्हर्सिटीच्या लेटरहेडवर लिहिलेलं आहे. जो कुणी लिलावात हे पत्र विकत घेईल त्याला टोकन (एनएफटी) आणि 5 डी बायोमेट्रीक आर्ट पासपोर्ट दिले जाणार आहे. जेणेकरून हे पत्र सत्य असल्याचे प्रमाणित होणार आहे. तसेच मालकाला काळानुसार पत्राची देखभाल करण्याची अनुमती देण्यात येणार आहे.

Please follow and like us: