TOD Marathi

अभिमानास्पद ! वजा 40 डिग्री सेल्सिअस तापमानात आणि 15000 फूट उंचीवर भारतीय जवानांनी अभिमानाने फडकवला राष्ट्रध्वज…

नवी दिल्ली: आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यादरम्यान तब्बल वजा 40 डिग्री तापमानात आणि 15000 फूट उंचीवर भारतीय जवानांनी मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवला आणि ‘भारत माता की जय’ म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये सुमारे 15 हजार फूट उंचीवर आणि वजा 40 डिग्री तापमानात राष्ट्रगीत म्हणत तिरंगा फडकावला.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी हिमाचल प्रदेशात 15 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. प्रसंग कोणताही असो, सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी सतत तत्पर असलेल्या आपल्या जवानांचा आपल्या सर्वांना नेहमीच अभिमान आहे. आयटीबीपीने ध्वजारोहणाचे फोटो सगळीकडे शेअर केले जात आहेत. देशात सर्वत्र 73 व्या प्रजासत्ताक दिनी उत्साहाचे वातावरण असून कार्यक्रमाची सुरुवात राजपथावर जवानांनी परेड करून केली. तर महाराष्ट्रात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.